दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील अचुक तपास, प्रभावी साक्षी सादरीकरण आणि न्यायालयात यशस्वी दोषसिद्धी मिळवण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.या कामगिरीबद्दल पाचगणी पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार देण्यात आला.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते व अति.पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सपोनि दिलीप पवार, हवालदार अमित कुंभार, रेखा तांबे उपस्थित होते.

पाचगणी हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. त्या अनुषंगाने सपोनि दिलीप पवार यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. मे महिन्यामध्ये पाचगणी पोलिस ठाण्याने प्रथम वर्ग न्यायालयाच्या निकालामध्ये सर्वात जास्त दोषसिद्धी प्राप्त करून जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

या गौरवामुळे पाचगणी पोलिसांची कार्यक्षमता आणि गुन्हेगारी नियंत्रणातील भूमिका अधोरेखित झाली आहे.

0000000000000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt