सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद

सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद

वाई : रस्ता व पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई-सुरूर रस्त्यावरील सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार, सुरूर ते वाई राज्यमार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस, तसेच रस्त्याचे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे १८ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी सुरूरमार्गे न जाता पाचवडमार्गे वाईकडे जायचे आहे. महाबळेश्वरवरून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाई ते सुरूर रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.

वाईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पाचवडमार्गेच साताऱ्याकडे जायचे आहे. वाहतूक वळविलेल्या ठिकाणी पोलिस दलाकडून दिशादर्शक फलक व बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. वाहतुकीतील या बदलाचे पालन करून वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक दोशी यांनी केले आहे.

वाई-सुरूर या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाईकडून राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या व वाईकडे येणाऱ्या सर्व एसटी बस पाचवडमार्गे जाणार आहेत. हे अंतर।वाढल्याने एसटी प्रशासनाने तिकीट दरात २५ रुपये वाढ केली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारची एसटी वाहतूक पाचवडमार्गे होणार असल्याची माहिती वाईचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी दिली.

हे पण वाचा  कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस

000000000000

Tags:

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt