- राज्य
- वीटभट्टी कामगाराच्या मुलाची सोनेरी कामगिरी
वीटभट्टी कामगाराच्या मुलाची सोनेरी कामगिरी
अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
मुंबई: प्रतिनिधी
बीड येथील वीटभट्टी कामगाराच्या अविनाश साबळे या मुलाने आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीफलचेस क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात तब्बल 36 वर्षानंतर भारतीय खेळाडूला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यापूर्वी सन 1989 मध्ये झालेल्या या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
राष्ट्रीय पातळीवरील विक्रमवीर अविनाश साबळे हा या स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार होता. या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करून अविनाशने चाहत्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवल्या. यापूर्वी सन 2019 मध्ये झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियन्स स्पर्धेत अविनाशने याच क्रीडा प्रकारात रोप पदक मिळविले होते.
जपानचा खेळाडू युतारो निनेने रौप्यपदक जिंकले. वास्तविक शेवटच्या टप्प्यात सुरुवातीला युतारो हाचआघाडीवर होता. मात्र, अविनाशने कडवी झुंज देत त्याला मागे टाकून सुवर्णपदक जिंकले. कतारच्या झकारिया एल्हामीने कांस्यपदक जिंकले.