सुशिक्षित युवतींची नोकरी ऐवजी गृहिणी बनण्याला पसंती

जाणून घ्या या मागची महत्त्वाची कारणे

सुशिक्षित युवतींची नोकरी ऐवजी गृहिणी बनण्याला पसंती

चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी महिला वर्गाने मोठा संघर्ष केला आहे. सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने, त्यांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्व गाजवत आहेत. मात्र, बदलत्या काळात महिलांची ही मानसिकता बदलताना दिसून येत आहे. त्यामागे अनेक कारणे असून ती विचार करायला लावणारी आहेत. 

मानसिक शांतता 

सध्याच्या काळात नोकरीच्या ठिकाणी महिला अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्या तरी देखील विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या कर्तृत्वात कोठेही कमी नसल्या तरी देखील त्यांना ऑफिसमधील अंतर्गत राजकारण, टार्गेट पूर्ण करण्याचा ताण आणि जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी ओढाताण महिलांना थकवताना दिसत आहे. 

कौटुंबिक जबाबदाऱ्या 

हे पण वाचा  'पुण्याची सांस्कृतिक ओळख ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार"'

आपल्या कामाच्या ठिकाणी महिला कितीही उच्चपदस्थ असली तरी देखील घरातील कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून त्यांची सुटका होत नाही. घरातील स्वयंपाक पाणी, मुलांचे पालन पोषण या जबाबदाऱ्या प्रामुख्याने महिलांनाच पार पाडाव्या लागतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरीतील जबाबदाऱ्या या दोन्ही सारख्याच क्षमतेने पार पाडणे सर्वच महिलांना शक्य होत नाही. त्यामुळे त्या कौटुंबिक जबाबदारीला प्राथमिकता देतात. 

कामाच्या समाधानाचा अभाव

अनेकदा चांगले शिक्षण घेऊन देखील महिलांना नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित पद मिळत नाही. वेतनमानात ही भेदभाव होतो. कितीही जीव तोडून काम केले तरीदेखील त्याची दखल घेतली जातेच असे नाही. 

अशा अनेक कारणांमुळे सुशिक्षित महिला देखील नोकरी करण्यापेक्षा गृहिणी बनण्यास पसंती देत आहेत. अनेक तरुणी उच्च शिक्षण घेऊन काही काळ नोकरी करणे आणि लग्नानंतर लगेच किंवा काही वर्षांनी गृहिणीची भूमिका पार पाडणे पसंत करीत आहेत. 

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt