गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक

पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान

गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक

पुणे: प्रतिनिधी

एकीकडे पुणे शहरातील गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होत असतानाच शहराच्या सर्व भागात व सर्व प्रकारच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही चिंताजनक बाब असून त्यांना गुन्हेगारीपासून रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शहरातील गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण तब्बल 35 टक्के एवढे आहे. गुन्हेगारी टोळ्या देखील अल्पवयीन मुलांचा वापर करून गुन्हे घडवून आणत आहेत. 

एकेकाळी शांत, सुसंस्कृत आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्याच्या काळात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. एकेकाळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींसाठी ओळखले जाणारे पुणे आता कोयता गँग, सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार, भाईगिरी यासाठी ओळखले जाऊ लागले आहे. 

शहरातील चोऱ्या माऱ्या, साखळी चोरी, दरोडे, सायबर गुन्हेगारी, अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही सध्या केवळ दहशत वाजवण्यासाठी गजबजलेल्या भागातून कोयता, तलवारीसारखी शस्त्र हातात घेऊन दादागिरी करणे आणि वाहनांची मोडतोड करणे हे प्रकार वाढीस लागले आहेत. 

हे पण वाचा  मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम

या सर्वांत गंभीर बाब म्हणजे या सर्वच प्रकारच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा लक्षणीय सहभाग आहे. समजण्याचे वय होण्यापूर्वीच मुलांमध्ये भाईगिरीचे आकर्षण निर्माण होत आहे. अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत येण्यापासून रोखणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून त्याच्या निराकरणासाठी केवळ पोलिसांनीच नव्हे तर पालक, शिक्षक, मनोविकार तज्ञ आणि एकूणच समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt