- राज्य
- माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल
उद्या करण्यात येणार शस्त्रक्रिया
On
मुंबई: प्रतिनिधी
माजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया केली जाणार आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमातून नारायण राणे यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पवार यांच्याप्रमाणेच राजकीय, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राणे यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
About The Author
Related Posts
Latest News
09 Sep 2025 22:02:43
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
वडगाव मावळ केशवनगर परिसरात झालेल्या वादातून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि ८ सायंकाळी ७ वाजण्याच्या...