वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

बीड: प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्याने केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामाही द्यावा लागला. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड मुख्य आरोपी असून त्याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार आहे. 

आजच्या सुनावणीत कराड याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. मागील सुनावणीत त्याच्या वकिलांनी तब्बल तीन तास युक्तिवाद करून कराड याचा या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करीत त्याची जामीनावर मुक्तता करावी, अशी मागणी देखील केली होती. 

या खटल्यात इतर काही आरोपींनी देखील जामीनासाठी आणि दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्या सर्वांवर 10 सप्टेंबरला सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

 

About The Author

Advertisement

Latest News

गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी
सोलापूर: प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरावर बंदी घातली आहे....
'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार'
अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'
अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Advt