- राज्य
- 'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'
'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'
निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबी असल्याचा शासन आदेश सरकारने त्वरित काढावा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी मुदत दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या भेटीनंतर ही मागणी करण्यात आली आहे.
न्या. शिंदे यांनी जरांगे यांना मराठवाड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तपासलेल्या नोंदीची आकडेवारी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेल्या तब्बल 58 लाख नोंदी हाच मराठी आणि ओबीसी एकच असल्याचा पुरावा आहे . न्या शिंदे समितीने 13 महिन्यात केलेल्या अभ्यासानुसार अहवाल घेऊन मराठवाड्यातील मराठी कुणबी असल्याचा शासनादेश निघाल्याशिवाय मी ऐकणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. सरसकट मराठी कुणबी होऊ शकत नाहीत तर सरसकट जाती इतर मागास प्रवर्गात कशा जातात, असा सवालह त्यांनी केला
मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचे न्या शिंदे यांनी तत्वतः मान्य केले. मात्र, कुणबी प्रमाणपत्र हे व्यक्तीला दिले जाईल. संपूर्ण जातीला, समाजाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हैदराबाद गॅझेट लागू होणार याची हमी त्यांनी दिली. मात्र, ते कशा पद्धतीने लागू करायचे याच्यासाठी अभ्यास आवश्यक असून त्याचे कायद्यात रूपांतर करावे लागेल. त्याला सहा महिन्याचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.