- राज्य
- अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
एकनाथ शिंदे यांचे विमान घेऊन गृहमंत्री गुजरातकडे रवाना
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई दौरा ऑटोपून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातकडे जाण्यासाठी विमानतळावर आले असता त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विमानातून पुण्याला निघाले होते. त्यांनी आपले विमान शहा यांना देऊ केले. त्या विमानातून शहा गुजरातकडे रवाना झाले आहेत.
आपल्या मुंबई दौऱ्यात शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पा आणि लालबागचा राजा यांचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
मराठा आरक्षण आंदोलन, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, बिहार मधील विधानसभा निवडणूक अशा अनेक विषयांवर शहा यांनी नेत्यांची चर्चा केली. त्याचप्रमाणे राज्यात होऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी रणनीती आखण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.