'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार'

उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यात मोबाईलवरून संवाद

'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार'

मुंबई: प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनी वरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरगे पाटील यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी एक प्रकारे जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत पाठिंबा व्यक्त केला आहे. 

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावून त्यांची जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून दिली. यावेळी, आमच्याबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाल्याचे पाहून आपल्याला अचंबा वाटला, असे ठाकरे म्हणाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या मागण्यांचं सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाल्याचे सांगण्यात आले. 

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दोन आमदारांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. विरोधकांनी देखील जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच सर्व प्रकारची मदत केलेली आहे. 

हे पण वाचा  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

About The Author

Advertisement

Latest News

गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी
सोलापूर: प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरावर बंदी घातली आहे....
'सरकारने करायला हवा जरांगे यांच्या मागण्यांवर विचार'
अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
'मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचा शासन आदेश काढा'
अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Advt