पत्रकार परिषदेत सिनेटसदस्याचा गंभीर आरोप: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोट्यावधींचा घोटाळा? 

सिनेट सदस्याकडून कुलगुरूंवर गंभीर आरोप 

पत्रकार परिषदेत सिनेटसदस्याचा गंभीर आरोप: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोट्यावधींचा घोटाळा? 

पुणे : देशातील नावाजलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक गैरप्रकार या अगोदर उघडकीस आलेले आहेत. परंतु आता विद्यापीठातील बोगस रॅकेट व विद्यापीठ फंडातील भ्रष्टाचार  हा नवीन गैरप्रकार उघडकीस आला असून विद्यापीठ फंडातील १०० कोटी रुपये परस्पर ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप सिनेट सदस्य सचिन गोर्डे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.या सर्व प्रकाराला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी याची मुकसंमती आहे असाही आरोप सचिन गोर्डे पाटील यांनी कुलगुरू डाॅ. गोसावी यांच्यावर केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा सारख्या विद्यापीठात अशाप्रकारे बेकायदेशीरपणे विद्यापीठ फंड ट्रान्सफर करणे म्हणजे ही अत्यंत गंभीर बाब असून याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी विद्यापीठाचे सिनेट सदस्य सचिन गोर्डे पाटील यांनी केला आहे.

वेगवेगळ्या प्रकरणात गैरव्यवहार कुलगुरूंकडून केला जात असल्याचा आरोप सिनेट सदस्य सचिन गोर्डे पाटील यांनी केला आहे. विद्यापीठात विदाऊट टेंडर कुठलाही खर्च  विद्यापीठ कायदा कलम 156 नुसार फक्त बारा लाख रुपये पर्यंत खर्च करण्याचा अधिकार कुलगुरूंना असताना कर्मचाऱ्यांची विमा योजना राबवण्यासाठी त्यांनी ३ कोटी 53 लाख रुपये मॅनेजमेंटची परवानगी नसताना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी विमा कंपनीला भरले आहेत तर हे कुलगुरू आहेत कि विमा कंपनीचे एजंट आहेत याचा एकदा खुलासा झाला पाहिजे. एका कंपनीला पंधरा कोटी रुपये प्रश्नपत्रिकेत टाईप करायचा आणि प्रूफ रिडिंग साठी टेंडर काढण्याचा परवाना दिला जातो. ही कुठली पद्धत आहे. बर त्या कंपनीचं नाव गाव याचा काही उल्लेख नाही. त्याचप्रमाणे विद्यापीठांमध्ये एक विभाग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचा जो वारंवार त्यांनी वेगवेगळ्या खाजगी क्लासेसची करार करून विद्यापीठातले हजारो कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे. ते पैसे घेण्यासाठी त्यांना कुठल्याही परवानगीची गरज वाटत नाही. ते क्लास दोन दोन खोल्यांमध्ये चालतात आणि त्यांच्यासाठी दहा दहा कोटी रुपये मॅनेजमेंटची  परवानगी न घेता त्यांना दिले जातात. सिनेटमध्ये आम्ही याला वारंवार विरोध केलेला आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

000

About The Author

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार
वडगाव मावळ/ प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत...
मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
आझम कॅम्पसमध्ये वृक्षारोपण उपक्रम उत्साहात 
रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई च्या नावाची मागणी
राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच 
रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी उजाळा देणार - सुनील वारे 

Advt