गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही?

काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा सवाल

गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही?

राज्य महोत्सवाबाबत तरतुद, नियमावली वा निश्चित व्याख्या’ काय?

पुणे: प्रतिनिधी

गणेश भक्तांमध्ये केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्याकरता केलेल्या घोषणेशिवाय गणेशोत्सवाला राज्य  महोत्सव म्हणून घोषित करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाला काहीही अर्थ नाही. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे मान्यता देणारा शासकीय निर्णय (जीआर) अद्यापही जारी झाल्या बाबतचा उल्लेख मिळत नाही. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळांवर अशा जीआरचा तपशील उपलब्ध नाही, असा दावा प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सव हा राज्य_महोत्सव” म्हणून साजरा केला जात असतांना त्या करताची बजेट तरतूद, नियमावली किंवा त्याची निश्चित व्याख्येबाबत शासकीय स्तरावर कोठेही स्पष्टता नसल्याने निव्वळ स्टंटबाजीशिवाय सरकारला या विषयी कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट होते.

हे पण वाचा  अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

गणेशोत्सवात सहभागी मूर्तीकार, कलाकार, मंडपवाले, वाद्ये वादक, पौरोहित्य करणारे, सेवेकरी, ढोल - ताशा पथकांचे साहित्य वा सजावट साहित्य वा सेवेवरील जीएसटी माफ करण्यात आला आहे का? किंवा त्यात सवलत देण्यात आली आहे काय? या उत्सवाचा ताण झेलत, गणेशोत्सव रात्रंदीवस सुरक्षितपणे व शांततेने पार पाडण्याकरता झटणारे पोलीस दलास प्रोत्साहनपर विशेष रजा, सुट्टी वा सवलत जाहीर केली काय, असे सवाल तिवारी यांनी केले आहेत.

आमदारांनी सुचविल्याप्रमाणे गणेशोत्सवासाठी 100 कोटी रु. निधीची मागणी होती. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी पुणे के शहरात G20 परिषदेच्या धर्तीवर व्यवस्था, पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि पंढरपूर वारीप्रमाणे व्यवस्थापनाची मागणी होती. तसेच गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी 10 कोटी रुपये बक्षिसे ठेवण्यात आली आहेत काय?  गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याने राज्य सरकार गाव आणि शहरांमध्ये उत्सवाच्या खर्चाचा काही भाग उचलणार आहे काय? गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचेही सरकारचे धोरण आहे काय, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

सुरक्षा आणि पायाभूत सुविधा

राज्याचा उत्सव साजरा करताना सामाजिक भान, पर्यावरणपूरकता आणि पर्यटक - भाविकांचा उत्साह यांचा समन्वय साधण्यासाठी सरकारने पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रायोजन केले आहे काय? सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून संबोधले व उत्सवाला सामाजिक एकता, राष्ट्रीयत्व, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाशी जोडले असून गणेशोत्सव सर्व धर्म, जात आणि भाषांना जोडणारा उत्सव असावा, अशी भूमिका असल्याचे समजते. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य असल्याची टीकाही काँग्रेस ने केली.  

याच धर्तीवर, तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ‘दही हंडी’ला राज्य क्रीड़ा दर्जा देण्याचे जाहीर करूनही प्रत्यक्ष तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार केल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही? गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही?
राज्य महोत्सवाबाबत तरतुद, नियमावली वा निश्चित व्याख्या’ काय? पुणे: प्रतिनिधी गणेश भक्तांमध्ये केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्याकरता केलेल्या घोषणेशिवाय गणेशोत्सवाला राज्य...
मराठा समाजाला तात्काळ हक्काचे आरक्षण द्या
'मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा'
मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी
'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही'
'मराठा आंदोलकांना सुविधा देणे ही आपली जबाबदारी'
'एक तर मुंबईतून विजययात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा...'

Advt