- राज्य
- आदिवासींच्या रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
आदिवासींच्या रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी
शासकीय सेवांमधील आदिवासी प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मागील वीस वर्षात शासकीय सेवेमध्ये आदिवासींच्या 63 हजार 693 उमेदवारांना सामावून घेण्यात आले. त्यापैकी 51 हजार 173 उमेदवारांनी वैध जात प्रमाणपत्र सादर केले. उर्वरित बारा हजार 520 कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आले आहे.
त्यामुळे रिक्त झालेल्या 12520 जागांवर आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांची भरती करण्यात आली आहे काय, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली असता ही पदे रिक्त असल्याचे आढळून आले.
या पदांवर आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांची भरती करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्याला हिरवा कंदील दाखवत फडणवीस यांनी ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.