- देश-विदेश
- इस्रायल आणि इराणच्या संघर्षात चीनची उडी
इस्रायल आणि इराणच्या संघर्षात चीनची उडी
इस्रायलला दोष देत इराणला दिले समर्थन
बीजिंग: वृत्तसंस्था
इस्रायल आणि इराणच्या संघर्षात आता चीनने देखील उडी घेतली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात असून इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, अशा शब्दात चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी ही वाढली आहे.
इस्रायलने विराणवर हवाई हल्ले करून त्यांची आण्विक केंद्र नष्ट केली आहेत. इराणचे लष्कर प्रमुख आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी आर्मीचे प्रमुख इस्रायलच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिरानंद देखील तेल अवीव आणि जेरुसलेम या ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. या हल्ल्यात इस्रायलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
इस्रायल आणि इराणच्या संघर्षात अमेरिकेने उघडपणे इस्रायलचे समर्थन केले नाही. उलट इराणशी वाटाघाटी करून सामोपचाराने वाद मिटवण्याची भूमिका व्यक्त केली आहे. इराण वरील इस्रायलच्या हल्ल्यांना आपली संमती नाही. इस्रायलने परस्पर ही मोहीम राबवली आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी देखील वर येणारी क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करण्यासाठी अमेरिकेची मदत होत आहे.
इराण इजरायल संघर्ष आता चीनने उडी घेतल्यानंतर. या संघर्षाचे गांभीर्य वाढले आहे. इराण आणि इजराइलचा संघर्ष अधिक व्यापक झाल्यास तो केवळ दोन देशांमधील संघर्ष न राहता त्याला जागतिक महायुद्धाच्या स्वरूप प्राप्त होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने सध्या सबुरीचे धोरण स्वीकारले असले तरी देखील चीनने उघडपणे इराणची बाजू घेतल्यानंतर अमेरिका देखील आक्रमक होऊ शकते. त्यामुळे या युद्धाला अधिक विनाशकारी स्वरूप प्राप्त होण्याची भीती आहे.