आयपीएल सामन्यात ना चियर लीडर्स, ना संगीत, ना फटाके

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ खेळाडू दंडाला बांधणार काळी पट्टी

आयपीएल सामन्यात ना चियर लीडर्स, ना संगीत, ना फटाके

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यामध्ये चिअर लीडर्स असणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे संगीत वाजवले जाणार नाही. त्याचप्रमाणे फटाक्यांची आतिषबजी देखील केली जाणार नाही. दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार आहेत. या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिटांचे मौन देखील पाळण्यात येणार आहे.

पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटले आहेत. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली यांच्यासह अनेक क्रिकेट खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताच्या 19 वर्षाखालील संघात खेळलेल्या एका माजी क्रिकेटपटूने तर यापुढे कधीही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नये, अशी मागणी केली आहे. 

या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यातही या हल्ल्याचा निषेध करण्याचा निर्णय सामना प्रशासनाने घेतला आहे. दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पर्यटक ठार झाले तर 20 हून अधिक जण जखमी आहेत. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत आहे. दि रेजिस्टन्स फ्रंट या लष्करे तय्यबाचा भाग असलेल्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

हे पण वाचा  विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना टाटा देणार एक कोटी रुपये

About The Author

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt