पाणी व स्वच्छता या आयामांना समाजात नेण्यासाठी समाजसेवी संस्थाचा पुढाकार कौतुकास्पद - आनंद शेखर 

पाणी व स्वच्छता या आयामांना समाजात नेण्यासाठी समाजसेवी संस्थाचा पुढाकार कौतुकास्पद - आनंद शेखर 

पुणे, प्रतिनिधी

पाणी व स्वच्छता या आयामाना समाजाच्या सर्व स्तरात नेण्यासाठी समाजसेवी संस्थानी सरकारला केलेले सहकार्य व पुढाकार कौतुकास्पद असून या सामाजीक सहयोगाने सर्वदूर गोदरीमुक्त व पेयजल व्यवस्था भविष्यातही उत्कृष्टपणे कार्यान्वयीत होईल, असा विश्वास नीती आयोगाचे अतिरिक्त अभियान संचालक आनंद शेखर यांनी केले. ते सेंटर फॉर यूथ डेवलपमेंट अँड अॅक्टिव्हिटी (CYDA) संस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सव वर्धापननिमित्त आयोजीत “WASH SUMMITT” उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

गेली २५ वर्षे सीवायडीए संस्था युवक विकास, उपजीविका, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती, शिक्षण, ग्रामीण विकास, पाणी, आरोग्य, स्वच्छता इत्यादि क्षेत्रात कार्यरत आहे, संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन दि. १० जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. 

या शृंखलेत पुण्यातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, यशवंतनगर, येरवडा येथे संपूर्ण दिवस संपन्न झालेल्या पाणी, आरोग्य, स्वच्छता-वॉश या शिखर परिषदेत मुख्य अतिथी म्हणून नीती आयोगाचे अभियान संचालक आनंद शेखर, वॉटरएड इंडियाचे मुख्य कार्यकारी व्ही.के.माधवन, वॉश विशेषतज्ञ महेश मिश्रा यांची उपस्थिती लाभली होती. 

हे पण वाचा  'गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा'

यावेळी पुढे बोलताना आनंद शेखर म्हणाले की, गेल्या काही वर्षात केलेल्या विशेष प्रयासानंतरही समाजातील काही घटक आजही शौचालय व पाणीव्यवस्थेपासून वंचित असल्यास त्यांनी या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी स्थानीक प्रशासनाकडे अर्ज करावा अथवा थेट जलशक्ती मंत्रालयातही वेबसाईटच्या माध्यमाने संपर्क करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.  

व्ही. के. माधवन 

पाणी- आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रातील आव्हाने या विषयी बोलताना वॉटरएड इंडियाचे मुख्य कार्यकारी श्री व्ही के माधवन यांनी सामाजीक संरचनेत ध्येयपूर्ती नंतरही येणारे आव्हाने सांगीतली. त्याचप्रमाणे या विषयातील सातत्य, समाजातील व्यवहार परिवर्तन आणि निरंतरता याबाबत प्रश्न उपस्थित केले, तसेच यात समाज, संघटना आणि स्थानिक सहभाग याने उपाययोजना करण्याचा सल्लाही दिला. 

महेश मिश्रा  

वॉश शिखर परिषदेच्या पहील्या सत्राच्या समारोप करताना वॉश विषयतज्ञ महेश मिश्रा यांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घालताना वातावरणीय बदलामुळे नष्ट होणाऱ्या नैसर्गिक संसाधनाबाबत काळजी व्यक्त करीत ही साधन संपत्ती संवर्धित व्हावी तसेच नव्या निर्माण स्त्रोतांचा शोध घ्यावा व त्यासाठी विशेष प्रयास करावे, असे आवाहन केले. 

शिखर परिषदेच्या विविध सत्रात “वॉश शाश्वतता, वॉशमधील नवीन तंत्रज्ञान आणि वॉशमधील  अत्याधुनिक शोध आणि नवकल्पना” यावर चर्चा करण्यात आली. सत्राच्या अध्यक्षपदी वॉश विषयतज्ञ महेश मिश्रा, प्लॅन इंडियाचे कार्यकारी संचालक मोहम्मद आसिफ, सेव द चिल्ड्रेनचे कार्यक्रम संचालक संजय शर्मा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शिखर परिषदेत “वॉश शाश्वतता, वॉशमधील नवीन तंत्रज्ञान आणि वॉशमधील  अत्याधुनिक शोध आणि नवकल्पना” या विषयांवर उद्बोधन करण्यात आले. यात विषयतज्ञ इकोसन सर्व्हिस फाऊंडेशनचे संचालक डॉ. दयानंद पानसे, ऍटलस कॉप्को इंडिया लि., चे सीएसआर  व्यवस्थापक अभिजित पाटील, वॉश मित्रा छत्तीसगडच्या कु. राधा धिवर, युनिसेफचे वॉश ऑफिसर, आनंद घोडके, आयआयटी मुंबई चे गौरव कापसे, साटोचे सौरभ पंड्या, फिनिशचे कार्यकारी व्यवस्थापक अभिषेक चौधरी, सेहगल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी आधिकारी ललित शर्मा, महापेकोनेटच्या करोन शैवा, जागतिक हवामान उपक्रम युनिसेफचे कार्यक्रम विशेषज्ञ श्री युसूफ कबीर आणि युथएड फाऊंडेशनच्या सीओओ ज्योत्स्ना बहिरट उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी एम, एन, सणीयाल, निटेश सिंगरुळ, शहाजी गडहीरे  आणि प्रिया कोठारी यांनी तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यानी परिश्रम केले. 

000

About The Author

Advertisement

Latest News

'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे' 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे'
  संत संमेलनाची मागणी पुणे: प्रतिनिधी  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार
'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 
तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'
वडगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराच्या शास्तीला अभय योजना
विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Advt