मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात

मराठी माणसाला 'पटक पटक के' मारण्याची केली होती वल्गना

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात

नवी दिल्ली: प्रतिनिधी

मराठी माणसाला 'पटक पटक के' मरण्याची वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना तीन मराठी रणरागिनींनी चांगलाच धडा शिकवला. त्यांच्यापुढे हात जोडत, तुम्ही माझ्या बहिणी आहात, असे म्हणत दुबे यांनी काढता पाय घेतला. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना मराठी आणि महाराष्ट्राबद्दल अनुद्गार काढणारे खासदार निशिकांत दुबे यांचा शोध महाराष्ट्रातील वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर या महाराष्ट्रातील महिला खासदारांनी लॉबीमध्ये दुबे यांना गाठले. मराठी माणसाच्या विरोधातली विधाने आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी दुबे यांना सुनावले. यावेळी या महिला खासदारांनी जय महाराष्ट्राच्या घोषणाही दिल्या. हा प्रकार बघून अनेक खासदार त्यांच्या भोवती जमा झाले. त्यांनी देखील दुबे यांच्या अपशब्द बद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी या महिला खासदारांसमोर हात जोडून, तुम्ही आपल्या भगिनी आहात, असे सांगत पळ काढला. 

त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची शक्ती करणारा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील साथ मिळाली. राजकीय विरोधकांसह समाजाच्या सर्व स्तरातून विरोध झाल्यामुळे सरकारला याबाबतीत पाऊल मागे घ्यावे लागले. सरकारने त्रिभाषा सूत्राशी संबंधित शासन निर्णय मागे घेत हिंदी सक्ती रद्द केली. 

हे पण वाचा  'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'

यानिमित्ताने निर्माण झालेल्या हिंदी विरुद्ध मराठी या वादा दरम्यान निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठीबद्दल अपशब्दांचा वापर केला. मराठी लोकांना पटक पटक के मारेंगे, असे शब्द त्यांनी वापरले. राज ठाकरे यांनी त्यांना मुंबईच्या समुद्रात डुबो डुबो मारेंगे, या शब्दात प्रत्युत्तर ह दिले होते. 

About The Author

Advertisement

Latest News

'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण' 'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'
बीड: प्रतिनिधी  महादेव मुंडे प्रकरणा त प्रशासन सुरुवातीपासूनच निष्क्रिय राहिले असून प्रशासनाकडून आरोपींची पाठराखंड केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडे...
इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?
'भाषेवरून मारहाण करणे नाही खपवून घेतले जाणार'
तुरुंगातून सुटल्यावर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
'... तर काय भोक पडणार आहेत का?'
डेंग्यूबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून जनजागृती
'महायुतीला कमीपणा येऊ देणार नाही'

Advt