'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे'

आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने आयोजित संत संमेलनात आग्रही मागणी

'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे'

 संत संमेलनाची मागणी

पुणे: प्रतिनिधी 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आलेtt. या संमेलना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे आणि गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावे, ही आग्रही मागणी करण्यात आली. 

गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 4  या काळात पार पडलेल्या या कार्यक्रमाला संत बौद्धिक मंचाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी स्वदेशानंद ब्रह्मगिरी महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेअसून नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यमराज खरात  यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन करण्यात आले. 

हे पण वाचा  वर्तन सुधारण्यासाठी ही शेवटची संधी: देवेंद्र फडणवीस

या संमेलनात भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिले जावे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला जावा, या मागण्या प्रामुख्याने मांडल्या गेल्या.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा यासाठी करण्याच्या उपक्रम आणि उपाययोजना, याबाबत सखोल विचार करण्यात येईल, असा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला.

भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे, यासाठी आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंच या दोन्ही संस्थां व्यापक स्वरूपात कार्य करीत आहेत. विशेषतः भारतीय तत्त्वज्ञान जगाला मार्गदर्शक असल्याची या संस्थांची धारणा असून भारतीय तत्त्वज्ञान जगभरात पोहोचविण्यासाठी या संस्था सातत्याने काम करीत आहेत.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे' 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे आणि भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे'
  संत संमेलनाची मागणी पुणे: प्रतिनिधी  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार
'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले 
तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'
वडगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराच्या शास्तीला अभय योजना
विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Advt