- राज्य
- 'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
'काँग्रेसने हिंदूंची व भारतीय जनतेची माफी मागावी'
मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी
विशिष्ट समाजाची मते मिळवण्यासाठी 'भगवा दहशतवाद' अथवा 'हिंदू दहशतवाद' अशा प्रकारची मिथके पसरवणाऱ्या काँग्रेसचा मुर्खा बुरखा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालात फाटला असून काँग्रेसने हिंदूंची आणि भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा विशेष न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्या खेरीज इतर कोणतेही आरोप तपास यंत्रणा सिद्ध करू शकली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
अमेरिकेतील पेंटॅगॉन मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम दहशतवाद हा विषय जगभरात चर्चेला आला. या विषयाला आणि विशिष्ट समाजाची आणि कट्टरवाद्यांची मते मिळवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने पोलिसांवर दबाव आणला आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या दहशतवादाचे मिथक पसरविले. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे हे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने या निकालानंतर हिंदूंची आणि भारतीयांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.