नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी

संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी जारी

नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी

नागपूर: प्रतिनिधी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घरात असतानाच त्यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा दूरध्वनी पोलिसांना आला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

रविवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गडकरी यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा दूरध्वनी नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला. पोलिसांनी तातडीने गडकरी यांच्या निवासस्थानावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून घरात शोध मोहीम हाती घेतली. 

त्याचप्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास सुरू केला. त्यात संशयित आढळलेल्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

हे पण वाचा  वर्तन सुधारण्यासाठी ही शेवटची संधी: देवेंद्र फडणवीस

About The Author

Advertisement

Latest News

Advt