- राज्य
- 'योगेश कदम यांच्या विरोधात लढणार न्यायालयीन लढाई'
'योगेश कदम यांच्या विरोधात लढणार न्यायालयीन लढाई'
मुबलक माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दमानिया यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात आपल्याकडे मुबलक पुरावे उपलब्ध असून ते जाहीर करण्याऐवजी त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.
योगेश कदम यांच्या आईच्या नावाने परवाना असलेल्या बारमध्ये अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार केल्याने ते अडचणीत आले आहेत. योगेश कदम यांच्यासह त्यांचे पिता व शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळले असले तरी त्यांना फार दिलासा मिळाला नाही.
या पार्श्वभूमीवर योगेश देशमुख यांच्यासह रामदास देशमुख न्यायालयीन कारवाईचे इशारे दिल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम हे उत्तम काम करीत असल्याचा दाखला देत त्यांच्यावर आरोप झाले म्हणून तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत देशमुख यांची पाठराखण केली आहे. मात्र विरोधी पक्षांसह अंजली दमानिया यांनी त्यांच्या विरोधात जाण्याचा इशारा दिल्यामुळे त्यांच्यासह महायुती सरकार समोर आव्हान उभे राहणार आहे.
वास्तविक आपल्याला बेबंदपणे केंद्रात आणि राज्यात सत्ता राबवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधात आवाज उठवण्यास प्राधान्य देणे आवश्यक होते. मात्र, सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडे असल्यामुळे त्यांच्या विरोधात मोहीम उघडणे आवश्यक असल्याचे दमानिया यांनी सांगितले.