पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

10 ऑगस्ट पासून रुळावर धावणार वेगवान गाडी

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

पुणे: प्रतिनिधी 

पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या वेगवान रेल्वे गाडीला 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास या गाडीमुळे वेगवान आणि सुलभ होणार आहे. 

ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर,दौंड या स्थानकांवर थांबणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या अधिक वेगवान आणि अधिक आरामदायक रेल्वे सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभेल, असा रेल्वे प्रशासनाला विश्वास आहे. 

वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेमुळे शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सेवा अशा अनेक क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागणार आहे, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. 

हे पण वाचा  ''खालिद का शिवाजीचे प्रदर्शन तात्पुरते रोखावे

पायाभूत सुविधांमध्ये अधिक वाढ करून त्याचा लाभ शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना प्रदान करून विकासामध्ये प्रादेशिक संतुलन राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून देखील वंदे भारत रेल्वे सेवा उपयुक्त ठरणार आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा' 'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा'
मुंबई: प्रतिनिधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सलीम जावेद यांच्या फिल्मी कहाण्यांप्रमाणे रचलेल्या कहाण्या लोकांना सांगत आहेत. त्यात...
'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
'कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर'
महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार
‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'

Advt