''खालिद का शिवाजीचे प्रदर्शन तात्पुरते रोखावे

राज्य सरकारची केंद्राकडे पुनर्परीक्षणाची मागणी,

''खालिद का शिवाजीचे प्रदर्शन तात्पुरते रोखावे

मुंबई: प्रतिनिधी 

'खालीद का शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते रोखावे आणि त्याचे पुनर्परीक्षण करावे, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. 

राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाला पत्र लिहून या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची व पुनर परीक्षण करण्याची मागणी केली आहे. 

राज्य पुरस्कार समारंभात देखील या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने देखील शाहिद का शिवाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करून केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्याचा आक्षेप घेऊन हिंदू महासंघाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. 

हे पण वाचा  '... म्हणून शरद पवार यांना आला ओबीसींचा कळवळा'

खारीत का शिवाजी या चित्रपटातील दिग्दर्शन राज मोरे यांनी केले आहे. हा चित्रपट आठ ऑगस्ट रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र, हिंदू महासंघासह खुद्द राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळापत्रकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt