प्रा. हाके यांनी फाडला हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर

राज्यभर आंदोलन उभारण्याचा ओबीसी नेत्यांचा इशारा.

प्रा. हाके यांनी फाडला हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर

पुणे: प्रतिनिधी 

हैदराबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुकर सरकारचा शासन आदेश घटनाविरोधी, अनेक न्यायालयीन आदेशांचा भंग आणि अवमान करणारा असल्याचा आरोप करून इतर मागासवर्गीय नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी या शासन आदेशाची प्रत फाडून टाकली. आतापर्यंत मराठा समाजातील अनेक जणांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण घेतले असून त्यांना या शासन आदेशामुळे अभय मिळणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे आश्वासन देणाऱ्या सरकारने शब्द फिरवला आहे. त्यामुळे ज्येष् मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ नाराजच नव्हे तर संतप्त झाले आहेत, असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्गाच्या ताटातील आरक्षण मराठा समाजाला दिले जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. या शासन आदेशाच्या विरोधात आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. आमच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

सरकारच्या शासन आदेशानुसार मराठ्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. वास्तविक, मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ही स्पष्ट केले आहे. मराठे हे कुणबी आहेत, असे म्हणणे हा सामाजिक मूर्खपणा ठरेल, अशी स्पष्टोक्ती न्यायालयाने केली आहे. त्यामुळे हा जीआर म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. ओबीसी हा राज्यातील सर्वात मोठा समाज असून त्यांच्यावर अन्याय करणे सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

हे पण वाचा  '... तर तुम्हाला रस्त्यावर फिरू नाही देणार'

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt