छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण
मुंबई / रमेश औताडे
मुंबई : आझाद मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते आंदोलनकर्त्यांनी अक्षरशः फुल्ल केल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. गर्दीचा ताण वाढत चालल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आझाद मैदानाकडे वाटचाल करणे अशक्य झाल्याने मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी थेट सीएसएमटी स्टेशनमध्ये प्रवेश करून खाली बसत ठिय्या आंदोलन सुरू केले. रेल्वे स्टेशनच्या आवारात अचानक हजारोंच्या संख्येने लोक बसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
या आंदोलनामुळे स्टेशन परिसरात घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. महिलांसह तरुण, वृद्ध मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. रेल्वे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त सुरक्षा तैनात केली. पोलिस दलालाही सतत आंदोलकांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागला.
000