- राज्य
- चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक
चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुंकले प्रचाराचे रणशिंग
On
मुंबई: प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 'चला, मुंबईत परिवर्तन घडवू या,' असे फलक शहरात जागोजागी उभारण्यात आले आहेत.
लवकरच राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत. मुंबई महापालिका शिवसेना ठाकरे गटाकडून हिसकावून घेण्याचा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा निर्धार आहे. मागील दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचा मुंबई महापालिकेवर प्रभाव राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याचे निमित्त साधून भाजपने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहा यांच्या स्वागताची जोरदार तयारी भाजपने केली आहे.
About The Author
Latest News
30 Aug 2025 20:15:50
सोलापूर: प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरावर बंदी घातली आहे....