'प्रफुल्ल लोढाचा तुरुंगात काढला जाऊ शकतो काटा'

एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

'प्रफुल्ल लोढाचा तुरुंगात काढला जाऊ शकतो काटा'

मुंबई: प्रतिनिधी 

हनी ट्रॅप प्रकरणामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला प्रफुल्ल लोढा याचा तुरुंगात काटा काढण्यात येऊ शकतो. त्यासाठी सत्ताधाऱ्यांपैकी काही जणांनी नियोजन केले आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

एके काळी मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्ती असलेला मात्र कालांतराने दुरावलेला प्रफुल्लोडा याचा हनी ट्रॅप प्रकरणात समावेश असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात काही मंत्री व अनेक वरिष्ठ अधिकारी अडकले असल्याची चर्चा आहे. 

हनी ट्रॅप प्रकरणात यांचा एक मंत्री अडकला आहे. एक महिन्यापासून लोढा याला अटक करून ठेवले आहे. कदाचित त्याला मारूनही टाकतील. त्यादृष्टीने या लोकांचे षडयंत्र चालले आहे, असा आरोप खडसे यांनी केला. 

हे पण वाचा  'रोहिणी खडसे रूपाली चाकणकर वादातून महिला आयोग सक्रिय?'

तपास करणारे लोक चाकणकर यांचेच 

रेव पार्टी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, या प्रकरणात तपास करणारे सगळे लोक चाकणकर यांचेच आहेत. याप्रकरणी सत्य काय ते बाहेर यावे आणि ते पोलिसांनी जाहीर करावे, अशी मागणी देखील खडसे यांनी केली. 

खेवलकर यांचा पाय खोलात

रूपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर खेवलकर यांचा पाय आणखी खोलात जात असल्याचे दिसून येत आहे. केवलकर यांनी पहिल्यांदाच अशी पार्टी केली नसून यापूर्वी अनेकदा मुलींना बोलावून पार्टी केल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने तरुणींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. खेवलकर यांच्या मोबाईलवर लॅपटॉपमध्ये पोलिसांना तरुणींचे अश्लील चित्रण आढळून आले असून काही चित्रणात स्वतः खेवलकरही दिसत आहे, असा आरोप चाकणकर यांनी केला आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अमराठी लोकांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मनसेवर...
'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा'
'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
'कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर'
महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार
‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

Advt