- राज्य
- राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
केवळ प्रसिद्धीसाठी अशा याचिका केल्या जात असल्याची न्यायालयाची टिप्पणी
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अमराठी लोकांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मनसेवर बंदी घातली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केवळ प्रचार आणि प्रसिद्धीसाठी अशा याचिका केल्या जात असल्याची टिपणी देखील न्यायालयाने केली आहे.
मराठी बोलण्यास नकार दिल्याबद्दल मनसैनिकांनी मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हिंदी शिकण्यासाठी सक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाला मागे घ्यावा लागला याबद्दल राग आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा देखील घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊन ही याचिका करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली.
या विषयात उच्च न्यायालयात जाण्याचा याचिकाकर्त्यांचा मार्ग मात्र सर्वोच्च न्यायालयाने खुला ठेवला आहे. ही याचिका प्रथम उच्च न्यायालयात का दाखल केली नाही? उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का, असे उपरोधिक सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केले.
मराठीच्या मुद्द्यावरून दरवेळी खळ्ळ खट्याक करू नका. जर कोणी मराठी बोलायला आणि शिकायला तर त्याला शिकवा. नम्रपणे वागणाऱ्याशी उर्मटपणा करू नका. उर्मटपणा करणाऱ्यांना मात्र सोडू नका, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.