'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा ही नौटंकी'

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा ही नौटंकी'

मुंबई: प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली मंडल यात्रा ही निव्वळ नौटंकी असल्याची टीका महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला इतर मागासवर्गीयांचा कोणताही कळवळा नाही. केवळ आगामी  निवडणुकीसाठी ओबीसींच्या मतांवर डोळा ठेवून आणि मुख्य म्हणजे इतर कोणतेही काम नसल्यामुळे ही नोटंकी सुरू केली आहे, असे बावनकुळे म्हणाले.

शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून नागपूर येथे मंडल यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाची ओबीसी मतपेढी आपल्याकडे ओढण्याच्या दृष्टीने पवारांनी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. 

हे पण वाचा  'खेळाडूंच्या यशात फिजिओथेरेपीस्टचे योगदान महत्त्वाचे'

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. त्यामुळे ओबीसींना नोकऱ्या, शिक्षण यात आरक्षण मिळण्याबरोबरच समाजाला आपल्या राजकीय शक्तीची जाणीव झाली आणि समाजातून सक्षम नेतृत्व उभे राहिले, हे ठरवण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याचप्रमाणे भाजपने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध केला होता याची आठवण करून देण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt