'हिंदीसक्तीचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर'

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांचा घणाघात

'हिंदीसक्तीचा आग्रह  धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर'

नवी मुंबई: प्रतिनिधी 

लहान मुलांवर हिंदी शिकण्याची सक्ती लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हिताचा मात्र विसर पडला आहे. त्यामुळे रायगड मधील भूमिपुत्रांनी स्वतःच्या हितासाठी स्वतःच जागरूक राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. 

रायगड जिल्ह्यातून भूमिपुत्रांचे विस्थापन होत आहे आणि बाहेरचे उद्योग इथे येत आहेत. या उद्योगांमध्ये भूमिपुत्र तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्यांना इथे व्यवसाय करता आले पाहिजे. त्यासाठी रायगडच्या भूमिपुत्रांनीच जागरूक राहण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मिता यांचा पुनरुचार केला. 

हे पण वाचा  रोहिणी खडसे यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट

'गुजरात मधील हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?'

एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यात हिंदी शिकण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपण हिंदी नव्हे तर गुजराती भाषिक असल्याचे अभिमानाने सांगतात. यावरून त्यांचे राजकारण लक्षात घेण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. गुजरात मध्ये हिंदी भाषेची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का, असा सवालह त्यांनी केला. 

लाल झेंडा सोबत दोन भगवे

सध्या राज्यातील राजकारण वाईट अवस्थेत आहे. कोणीही कधीही कुठल्याही पक्षात जातो. पूर्वीच्या राजकारण्यांची मने मोठी होती. आता ती संकुचित होत आहेत. शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद डांगे उपस्थित होते. अर्थात, भगव्या झेंड्या बरोबर लाल झेंडा ह आला होता. आता शेतकरी कामगार पक्षाच्या काळ्या झेंड्या बरोबर दोन दोन भगवे आले आहेत, असे ठाकरे यांनी नमूद केले. 

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt