पुणे: प्रतिनिधी
मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून दूरचित्रवाणी आणि रुपेरी पडद्यावरील अभिनेता आशिष कपूर याला पोलिसांनी अटक केली आहे.
आशिष आणि एका तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आशिषने तिला पार्टीसाठी घरी पाचारण केले. यावेळी त्याचा एक मित्र आणि त्याची पत्नी उपस्थित होती.
यावेळी आशिष याने बाथरुममध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्या मित्राच्या पत्नीने मारहाण केल्याचेही तिचे म्हणणे आहे. मात्र, या मित्राच्या पत्नीनेच संपर्क साधून घडलेल्या अत्याचाराची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आशिष याला पुण्यात अटक केली आहे.
आशिष कपूर हा सात फेरे, देखा एक ख्वाब, या मालिकांमधून लोकप्रिय अभिनेता बनला आहे. त्याने इंकार, कुर्बान, टेबल नंबर २१ या चित्रपटातही काम केले आहे.