- राज्य
- वडगावातील धोकादायक बनलेल्या ‘या’ ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीची मागणी
वडगावातील धोकादायक बनलेल्या ‘या’ ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीची मागणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत हद्दीतील गावठाण रस्त्यावरील गेल्या दीड महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत असलेल्या आणि गंभीर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ड्रेनेजच्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोरया चौक दरम्यान असणाऱ्या गावठाण रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर गेल्या दीड दोन महिन्यांपासून फुटले आहे. परिणामी त्या ठिकाणी रस्त्यावर धोकादायक खड्डा निर्माण होण्याबरोबरच ड्रेनेज मधील सांडपाणी घाण -केरकचरा बाहेर येऊन सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे.
फुटलेल्या ड्रेनेज चेंबरच्या ठिकाणी निर्माण झालेला रस्त्यावरील जीवघेणा खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. गेल्या कांही दिवसात 3 -4 अपघात होवून शालेय विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिकाना व दुखापत झाल्याची घटना घडली आहे.
About The Author
