- राज्य
- गोट्या गित्ते याच्यासह पाच जणांवरील मोक्का अंतर्गत गुन्हा मागे
गोट्या गित्ते याच्यासह पाच जणांवरील मोक्का अंतर्गत गुन्हा मागे
फड टोळीच्या म्होरक्यासह दोघांवरील मोक्का मात्र कायम
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा उजवा हात असलेल्या गोट्या गित्ते याच्यासह फड टोळीतील पाच जणांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. मात्र, या टोळीच्या म्होरक्यासह दोघांवरचा मोक्का कायम ठेवण्यात आला आहे.
परळी तालुक्यातील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर 18 ऑक्टोबर 2023 रोजी फड टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सातभाई. हल्लेखोरनी त्यांच्या खिशातील दोन लाख 70 हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून नेली.
या प्रकरणानंतर रघुनाथ फड या म्होरक्यासह त्याच्या टोळीतील. धनराज उर्फ राजाभाऊ फड, गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, गुन्हेगारीचा मोठा इतिहास असलेले रघुनाथ फड आणि राजाभाऊ फड यांच्यावरील मोक्का कायम ठेवण्यात आला असून इतर आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाईतून वगळण्याचा निर्णय अप्पर पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.
यापैकी गोट्या गित्ते हा दीर्घकाळ फरार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड याचा तो उजवा हात मानला जातो. फरार असतानाच काही काळापूर्वी त्याने आपला कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचा दावा करणारा व्हिडिओ समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला होता.