युती जाहीर होण्याआधीच ठरले जागा वाटपाचे समीकरण

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यात समझोता

युती जाहीर होण्याआधीच ठरले जागा वाटपाचे समीकरण

मुंबई: प्रतिनिधी 

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात असून मुंबई महापालिकेसाठी या दोन्ही पक्षांचे जागा वाटपाचे समीकरण निश्चित झाल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मूळ मुंबईत ठाकरे गट आणि मनसे समसमान जागा लढविणार असून उपनगरांमध्ये त्या त्या पक्षाचे बळ आणि उमेदवार यांच्या आधारावर 60 टक्के जागा शिवसेना तर 40% जागा मनसे लढवणार असल्याचे सूत्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघेही तब्बल 19 वर्षांनी एका व्यासपीठावर आले. तेव्हापासूनच ठाकरे बंधू राजकीय दृष्टीने देखील एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत वारंवार ग्वाही दिली असली तरी राज ठाकरे सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दरम्यान या दोन्ही पक्षांची युती होईल. दिवाळीच्या आसपास त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हे पण वाचा  न्यायालयाने मान्य करूनही मुस्लिमांना आरक्षण का नाही?

About The Author

Advertisement

Latest News

Advt