'... हे तर मूर्ख बनविण्याचे धंदे'

मोदी यांच्या भाषणावर संजय राऊत यांची टीका

'... हे तर मूर्ख बनविण्याचे धंदे'

मुंबई: प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराबाबत केलेली घोषणा ही जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. ते करण्यापेक्षा मोदी यांनी आम्हाला आमचे पंधरा लाख रुपये द्यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सेवा व वस्तू करात केलेल्या बदलामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुसह्य होणार आहे, असे दावे केले. मात्र, संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या या दाव्याची खिल्ली उडवली.

पंतप्रधान मोदी यांनी काल देशाला संबोधित करून काही सवलती जाहीर केल्या. या सवलती एकूण दोन लाख कोटी रुपयांच्या आहेत. अर्थात 140 कोटी भारतीयांना वर्षाला प्रत्येकी बाराशे तेरा रुपये वाचवता येणार आहेत. अर्थात महिन्याला केवळ 110 ते 120 रुपयांचा लाभ मिळणार आहे, असे राऊत म्हणाले. 

हे पण वाचा  'यापुढे ओबीसींनी ओबीसींना मतदान करावे'

भारत पाकिस्तान सामना बघावा म्हणून... 

दर वेळी पंतप्रधान मोदी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतात. यावेळी मात्र त्यांनी संध्याकाळी पाच वाजण्याची वेळ साधली. पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि भारतीय संघाचा विरोध असून देखील खेळवण्यात आलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना आठ वाजल्यापासून बघता यावा यासाठीच मोदी यांनी पाच वाजता भाषण केले, असा दावा राऊत यांनी केला. यावरूनच मोदी किती महान देशभक्त आहेत हे सिद्ध होते, असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt