शासकीय अधिकाऱ्यांनी पदाची प्रतिष्ठा व मर्यादा सांभाळावी: बावनकुळे

कार्यालयातील खुर्चीवर बसून गाणे सादर करणारा तहसीलदार निलंबित

शासकीय अधिकाऱ्यांनी पदाची प्रतिष्ठा व मर्यादा सांभाळावी: बावनकुळे

मुंबई: प्रतिनिधी

प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे, हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

उमरी, जि. नांदेड येथून रेणापूर, जि. लातूर येथे बदली झालेले तहसीलदार श्री. प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये श्री. थोरात विविध अंगविक्षेप व हातवारे करताना दिसत असून, त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही, असे बावनकुळे यांनी नमूद केले.

या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे.सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. 

हे पण वाचा   उच्च न्यायालयाकडून घटस्फोटीत पत्नीविरुद्ध अवमान कार्यवाही

About The Author

Advertisement

Latest News

'... तर निर्माण होईल समाजाची फसवणूक झाल्याची भावना' '... तर निर्माण होईल समाजाची फसवणूक झाल्याची भावना'
मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र,...
सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव 
मावळात पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल; विदेशी वृक्षांच्या जागी स्थानिक प्रजातींची लागवड
'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'
मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार
'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित

Advt