- राज्य
- सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव
सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव
शरद पवार यांनी समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप
On
मुंबई: प्रतिनिधी
आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना काही संतप्त आंदोलकांनी घेराव घातला. शरद पवार यांनी समाजाचे वाटोळे केल्याचा त्यांचा आरोप होता. काहींनी सुळे यांच्या गाडीवर बाटल्या देखील भिरकावल्या.
जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुळे या आंदोलन स्थळी आल्या होत्या. मात्र, तरंगे पाटील झोपलेले असल्यामुळे त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. अन्य समन्वयकांशी चर्चा करून सुळे यांनी आंदोलनाबाबत माहिती घेतली.
सुळे या आंदोलन स्थळावरून परत निघाल्या असता काही आंदोलकांनी घेराव घातला. पवार यांच्या भूमिकेबद्दल क्षमता व्यक्त करून त सुळे यांना जाब विचारू लागले. मात्र, यावेळी अन्या काही आंदोलकांनी पुढे होऊन सुप्रिया सुळे यांना जाण्यास मदत केली. घेरावातून बाहेर पडून कशाबशा त्या गाडीत बसल्या. त्यांची गाडी पुढे निघाली असता काही आंदोलकांनी मागून त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या.
जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलकांना शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने आंदोलन करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. मात्र, आंदोलनाचा कालावधी वाढत असताना आणि जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
About The Author
Latest News
01 Sep 2025 16:34:06
राज्य महोत्सवाबाबत तरतुद, नियमावली वा निश्चित व्याख्या’ काय?
पुणे: प्रतिनिधी
गणेश भक्तांमध्ये केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्याकरता केलेल्या घोषणेशिवाय गणेशोत्सवाला राज्य...