- राज्य
- उच्च न्यायालयाकडून घटस्फोटीत पत्नीविरुद्ध अवमान कार्यवाही
उच्च न्यायालयाकडून घटस्फोटीत पत्नीविरुद्ध अवमान कार्यवाही
मुलाच्या ताबा आणि भवितव्याबाबत घटस्फोटितांचा दावा
पुण: प्रतिनिधी
सुशिक्षित आणि उच्चभ्रू घटस्फोटीत पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाला नवे वळण मिळाले असून, कर्नाटक उच्च न्यायालयाने याप्रकरणी महिलेविरुद्ध अवमान कार्यवाही सुरू केली आहे. मुलाच्या संयुक्त ताब्यासंबंधीच्या न्यायालयीन आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याचा आरोप या महिलेवर करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेच्या घटस्फोटीत पतीने, पुणे-स्थित ज्येष्ठ कायदेपंडित अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांच्या माध्यमातून, अपर्णा बॅनर्जी हिच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते, ७ जून २०२३ रोजी न्यायालयाने नोंदवलेल्या परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या आदेशानुसार, मुलाच्या शिक्षण आणि कल्याणाविषयी निर्णय दोन्ही पालकांनी एकमताने घेणे बंधनकारक होते.
तथापि, आईने एकतर्फी निर्णय घेत पुण्यातून मुलाला बेंगळुरूला हलवले आणि शाळेतून काढले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. यामुळे वडिलांचा मुलाशी सर्व प्रकारचा संपर्क तुटला.
अॅड. श्रीवास्तव यांनी मांडलेल्या युक्तिवादांवर न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितले की, आईचे हे पाऊल आधीच्या आदेशाचे उल्लंघन असून मुलाच्या हितासाठी प्रतिकूल आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ३० ऑक्टोबर रोजी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले असून अपर्णा बॅनर्जी यांना स्वतः उपस्थित राहण्यासाठी निर्देश दिले आहेत.
कायद्याच्या तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणातून मुलांच्या कल्याणाशी संबंधित परस्पर संमतीने झालेल्या समझोत्यांचे पालन किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. प्रकरण अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहे.