- राज्य
- 'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...'
'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...'
प्रतापराव जाधव यांनी केले 'जय गुजरात'चे समर्थन
धाराशिव: प्रतिनिधी
गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही. ते आपलेच एक शेजारी राज्य आहे. पूर्वी मुंबई प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होते. त्यावेळी मुंबई त्यांची देखील राजधानी होती. त्यामुळे 'जय गुजरात' या घोषणेचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात केंद्रीय आयुष मत्री प्रतापराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
गुजरात काही पाकिस्तानात नाही. आपलेच शेजारी राज्य आहे. लहानपणापासून आपण, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा करत आलो आहोत. त्यामुळे जय गुजरातच्या घोषणेवरून राजकारण करणे अयोग्य आहे, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
पुणे येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि त्याबरोबरच जय गुजरात हा नारा दिला. त्यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.