- राज्य
- लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे अयोग्य: फडणवीस
लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे अयोग्य: फडणवीस
आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही. या प्रकरणी कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केवळ मागवले. त्या जेवणातील डाळीला दुर्गंध येत होता तर भात किमान तीन दिवस शिळा होता, असा गायकवाड यांचा आरोप आहे. पहिला घास खाल्ल्यानंतर आपल्याला शिसारी आली तर दुसरा घास खाल्ल्यानंतर उलटी झाली, असा त्यांचा दावा आहे. त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या विषयावर अधिवेशन काळात विरोधकांनी गायकवाड यांच्यासह सरकारला टीकेचे लक्ष्य केले.
आमदार निवासातील जेवण निकृष्ट दर्जाचे असले तरी देखील कर्मचाऱ्यांना मारहाण करणे योग्य नाही. ते कायद्याला धरून नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. आमदार निवास सर पंचतारांकित हॉटेल सारखे नाही तरी किमान खानावळीच्या दर्जाचे जेवण उपलब्ध व्हाव, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.