- राज्य
- पुतळ्यावर रंग फेकणारा शिवसैनिकाचा भाऊच
पुतळ्यावर रंग फेकणारा शिवसैनिकाचा भाऊच
मालमत्तेच्या वादात ठाकरे पिता पुत्र हस्तक्षेप करत असल्याचा रोष
मुंबई: प्रतिनिधी
शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणारा माणूस शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय शिवसैनिकाचा चुलतभाऊ असल्याचे निदर्शनास आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. घरगुती संपत्तीच्या वादात ठाकरे पिता पुत्र हस्तक्षेप करत असल्याच्या रोषातून आपल्या हातून हे कृत्य घडल्याचे आरोपीने कबूल केले आहे.
उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव आहे. आपला चुलतभाऊ हा ठाकरे यांचा जवळचा शिवसैनिक आहे. आपल्या मालमत्तेच्या वादात उद्धव व आदित्य ठाकरे हस्तक्षेप करीत असल्याचा राग अनावर झाल्याने आपल्या हातून हे कृत्य घडले, असे पावसकर यांनी पोलिसांना सांगितले.
काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर संतप्त शिवसैनिक घटनास्थळी जमले. त्यांनी पुतळ्याची साफसफाई केली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास सुरू केला. त्या आधारे पावसकर याला अटक करण्यात आली आहे.