- राज्य
- मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी
मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी
चटणी भाकरीचा नेवैद्य दाखवत केला सरकारचा निषेध
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांनी मंतलयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांना दोन दिवस पाणी देण्यात आले नसल्याचा आरोप करून चटणी भाकरीचा नेवैद्य दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला.
आजपासून मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र झाले असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणीही न घेता कडक उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे आंदोलकही अधिक आक्रमक झाले आहेत.
सरकारने आमच्यावर गोळ्या झाडल्या तरीही मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा ही कुणबी या जातीची पोटजात मानून इतर मागास प्रवर्गात आरक्षण देण्याचा शासन आदेश जारी करावा, अशी त्यांची मागणी आहे.
तब्बल 58 लाख नोंदींमुळे मराठा हे कुणबी असल्याचे सिद्ध होत आहे. ज्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे ते घेतील. सरकारने केवळ आदेश जारी करण्याचे काम करावे, अशी मागणी करतानाच जरांगे पाटील यांनी, सरकारकडून केवळ वेळ काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही केला आहे.