कुरुंदवाड लॉजवर वेश्या व्यवसायाची चर्चा!
तपासात धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता
On
शिरोळ, प्रतिनिधी
शिरोळ येथील दीपक मगदूम खून प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून तपासादरम्यान एका लॉज व्यवसायिकाचे नाव पुढे आले आहे. कुरुंदवाड येथील एका लॉजवर हे तरुण जाणार असल्याची माहिती समोर आली असून, सदर लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खमंग चर्चा सध्या शिरोळ तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे तपासाचे केंद्रबिंदू आता त्या लॉजवर वळले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, खून होण्याच्या आधी संशयित आरोपी लॉजवर जाण्याच्या तयारीत होते का, याचा तपास सुरू आहे. संबंधित लॉज मालकाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, शिरोळ तालुक्यात लॉज व्यवसायाच्या आड वेश्या व्यवसाय सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विशेषतः कुरुंदवाड मार्गावरील एका लॉजवर अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही मिळाल्या आहेत. मात्र, याबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याने अशा व्यवसायांना अप्रत्यक्षरित्या संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे.
दीपक मगदूम खून प्रकरणाशी या लॉजचा संबंध असल्यास, हे प्रकरण केवळ खुनापुरते मर्यादित न राहता सामाजिक व नैतिक पातळीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करणार आहे. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित लॉजवर तात्काळ छापा टाकावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
000
About The Author
Latest News
03 Aug 2025 18:54:11
पुणे: प्रतिनिधी
संस्कार हीच राजपूत क्षत्रिय स्त्रीची खरी ओळख असून काळानुरूप जरूर आधुनिक व्हा, मात्र, संस्कार सोडू नका, असे आवाहन...