लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू!

दिवा मुंब्रा दरम्यान झाला अपघात, अनेक जण जखमी

लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू!

मुंबई: प्रतिनिधी 

दिवा मुंब्रा दरम्यान लोकलच्या दारात उभे राहिलेले प्रवासी शेजारून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासून खाली पडले आणि आठ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी असून त्यांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने आपोआप बंद होणाऱ्या दारांच्या लोकल. गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु;:ख व्यक्त केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मुंबईकडे जाणाऱ्या लोकलला अतोनात गर्दी असल्यामुळे प्रवासी लोकलच्या दाराबाहेर लटकत होते. शेजारून आलेल्या एक्सप्रेसला घासून दारात लटकणारे प्रवासी खाली पडले. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला. 

आपल्याकडे नगर नियोजन नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाही. रस्ते नाहीत, पार्किंग नाही, रस्त्यांवर वारंवार कोंडी होत असते. मुंबई, पुणे, आणि अशा सर्व शहरांमध्ये हीच अवस्था आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मेट्रो सारख्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मात्र त्याने प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी या अपघाताबद्दल संताप व्यक्त केला. 

हे पण वाचा  रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt