बळ नसताना स्वबळाचा खेळ बंद करावा - नारायण बागडे

बळ नसताना स्वबळाचा खेळ बंद करावा - नारायण बागडे

मुंबई / रमेश औताडे 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बळ नसताना स्वबळाचा लपंडाव जो खेळ रिपाइं मधील काही नेत्यांनी सुरू केला आहे तो बंद करावा असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वराज्य संस्था निवडणुकीचा खरा हक्कदार हा चळवळीचा कार्यकर्त्यां आहे. त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे समाजाचे आणि नेत्यांचे कर्तव्य आहे. मात्र काही नेते आपल्या सोईचे राजकारण कसे करता येईल यात रमले आहेत. रिपब्लिकन गटातील काही नेत्यांच्या खेळात खरा कार्यकर्ता मागे राहिला आहे. या पार्श्वभूमीवर २६ जुन रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ता मनपा भेजो अभियान कोल्हापूर येथून प्रारंभ होणार आहे.

आंबेडकरी समाजातील मतदानाचे विभाजन करून दुसरे पक्ष मजबूत करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या पदरात आपल्या समाजाची मते पाडून घेण्यासाठी पुरोगामी असो कि प्रतिगामी असणाऱ्या पक्षासोबत  हात मिळवणी करून राजकीय वाटा किती मिळेल याचा विचार करावा.  तीच खरी पावती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे हेच नेत्यांचे कर्तव्य आहे असे मत बागडे यांनी यावेळी व्यक्त केले.

हे पण वाचा  रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt