- राज्य
- वडगावमध्ये गणेश मंडळांच्या पारंपरिक नियमात बदल केल्याने इतर मंडळात नाराजीचा सूर
वडगावमध्ये गणेश मंडळांच्या पारंपरिक नियमात बदल केल्याने इतर मंडळात नाराजीचा सूर
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या क्रमांकात बदल करू नये ; गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी
वडगाव मावळ प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक नियमात बदल केल्याने इतर मंडळात नाराजीचा सूर उमटला आहे दरम्यान अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने चालत असलेल्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या क्रमांकात बदल करू नये, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत श्री पोटोबा देवस्थान ट्रस्ट,जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्ट व वडगाव मावळ पोलिसांना निवेदनात देण्यात आले आहे
निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असताना अनेक जुनी मंडळे आहेत. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिला गणपतीमध्ये श्री सिद्धिविनायक व मोरया ही दोन मंडळे सुरुवातीपासून सामील होत आहेत. परंतु यंदाच्या मिरवणुकीत अजून एक मंडळाचा नवीन रथ मिरवणुकीत सहभागी झाला.
जे यापूर्वी मिरवणूक रांगेत कधीही नव्हते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक नियमात बदल केल्याने इतर मंडळात नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे भविष्यात असे वाद होऊ नये यासाठी कोणत्याही नवीन मंडळाला क्रमांक एकमध्ये सहभागी करून घेऊ नये. जेणे करून व्यत्यय येऊन मिरवणुकीला उशीर होईल व वाद निर्माण होईल. मिरवणुकीला गालबोट लागू नये यासाठी आपण भविष्यात कोणत्याही मंडळाला कोणतीही परवानगी देऊ नये.भविष्यात आपण अशा प्रकारे चुकीची प्रकारे परवानगी अथवा कोणतेही मंडळ यांनी मिरवणुकीत क्रमांकात बदल करून घुसखोरी केल्यास सर्व मंडळ "श्रीं" चे विसर्जन करणार नाही. असा इशारा यावेळी देण्यात आला
यावेळी जय बजरंग तालीम मंडळ, सिद्धिविनायक, मोरया, बालविकास, जय जवान जय किसान, अष्टविनायक, जयहिंद, गणेश, आदर्श, नवचैतन्य, श्रीराम, कानिफनाथ, साईनाथ, विजयनगर, योगेश्वर, पंचमुखी, इंद्रायणी, दिग्विजय, शिवशंभो, पंचशील आदी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
About The Author
