'पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हाची आवश्यकता नाही'

असलम बागवान यांची चिन्ह विरहित निवडणूक घेण्याची मागणी

'पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हाची आवश्यकता नाही'

पुणे : प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतपत्रिकेवर उमेदवाराचा चेहरा, नाव  आणि पक्षाचे नाव असल्याने चिन्हाची आवश्यकता नाही. त्यामुळे ते हटवून चिन्हविरहीत निवडणूक घ्यावी, अशी मागणी लोकसेना पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार असलम इसाक बागवान यांनी केली आहे.

या संदर्भात बागवान यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलनही केले.  

लोकसेना पक्ष, रयत कामगार संघटना, दलित मजदूर संघटना, मुस्लिम उलेमा संघटना यांनी या मूक आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती असलम बागवान यांनी दिली. 

हे पण वाचा  ... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद

१ मे २०१५ रोजी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतपत्रिकेवर   उमेदवाराचे छायाचित्र लावणे निश्चित केले आहे.  हा लोकतान्त्रिक आणि संविधानिक निर्णय आहे. छायाचित्रा बरोबर आता कोणत्याही आकृतीची (चिन्हाची) आता आवश्यकता नाही. कारण घटनेत चिन्ह याचा कोठेही उल्लेख नाही. असे चिन्ह ठेवणे घटनाबाह्य होईल. त्यामुळे  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतपत्रिकेवर असलेले चिन्ह हटवावे, असे बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt