- राज्य
- वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपपत्र दाखल
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपपत्र दाखल
तब्बल १ हजार ७६७ पानात हगवणे कुटुंबीयांकडून झालेल्या छळाची कथा
पुणे: प्रतिनिधी
सासरच्या लोकांकडून झालेल्या छळामुळे वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणात ५६ दिवसानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल १ हजार ७६७ पानांच्या या आरोपपत्रात हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीच्या झालेल्या छळाची कथा मांडण्यात आली आहे.
हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी यांनी १६ मे २०२५ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर वैष्णवीचा पती, सासू, सासरे, दीर, नणंद यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नणंदेचा मित्र निलेश चव्हाण यालाही अटक करण्यात आली. हे सर्वजण अद्याप अटकेत आहेत. त्याचप्रमाणे वैष्णवी यांचे सासरे व दीर यांना फरार होण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
वैष्णवी यांनी १६ मे रोजी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पती शशांक यांनी हाक मारून देखील प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी आत्महत्येचा प्रकार लक्षात आला. वैष्णवी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हुंड्यासाठी आपल्या मुलीचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी केला. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
.