'... तर किती तरी लोकांचा होईल मोरया'

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला

'... तर किती तरी लोकांचा होईल मोरया'

मुंबई: प्रतिनिधी 

मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत अभिनेता दिनो मारियो यांनी तोंड उघडले तर किती तरी लोकांचा मोरया होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. भ्रष्टाचाराचा आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी सुनावले. 

मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम तब्बल दोन दशके सुरू आहे. त्यात दिनो मारियो याचे नाव पुढे आले असून त्याची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. त्याने जर तोंड उघडले तर अनेकांचे बिंग उघडे पडेल, असे शिंदे म्हणाले. इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी आपल्या कारभाराकडे पहावे, असे ऐकवतानाच, 'खुद शिशे के घर मे रहनेवाले दुसरों के घर पे पत्थर नही फेका करते,' असेही शिंदे यांनी सुनावले. 

मिठी नदीतील गाळ काढण्याचे कंत्राट तब्बल १८ कंत्राटदारांना देण्यात आले आहे. तब्बल १ हजार १०० कोटी रुपयांचे हे कंत्राट आहे. या कंत्राटदारांपैकी बहुतेक कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आहे. या कंत्राटात बृहन्मुंबई महापालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरो पासून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही कंत्राटे देताना मराठी कंत्राटदार सापडला नाही का? यांना दिनो मारियोच कसा सापडला, असे सवाल शिंदे यांनी मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला केला. 

हे पण वाचा  बार आणि रेस्टॉरंट्सचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा

सिमेंटचे रस्ते एकदा केल्यानंतर 25 वर्ष त्याच्याकडे बघावे लागत नाही. या पार्श्वभूमीवर दरवर्षी दुरुस्तीचे काम काढून, काळ्याचे पांढरे करून पैसे लुबाडण्याचे काम कोणी केले? टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारे वेंडर कोण आहेत त्याची नावे उघड करा. सगळी यादी काढा, असे आव्हान शिंदे यांनी दिले. आम्ही डीप क्लीन ड्राईव्हने मुंबईतले रस्ते धुतले तर तुमच्या लोकांनी महापालिकेची तिजोरी धुण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt