'... म्हणून वाल्मीक कराडची दोषमुक्ती नाहीच'

काही निरीक्षणे नोंदवत मोका न्यायालयाने केले स्पष्टीकरण

'... म्हणून वाल्मीक कराडची दोषमुक्ती नाहीच'

मुंबई: प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड हाच सूत्रधार असून तो गुन्हेगारी टोळीचा मोरक्या आहे, असे निरीक्षण नोंदवून संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा विशेष न्यायालयाने कराड याचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे वाल्मिक याच्या वकिलांनी सांगितले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला या प्रकरणात दोष मुक्त करावे, असा अर्ज वाल्मीक कराड यांनी वकिलांमार्फत न्यायालयाला केला होता. याबाबत न्यायालयाने काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. 

पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागण्यात संतोष देशमुख आड आल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख वाल्मीक कराडच आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच अपहरण करून ही हत्या करण्यात आली. 

हे पण वाचा  'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'

वाल्मीक कराड याच्यावर वीस पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मागच्या दहा वर्षात अत्यंत गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 

आवादा कंपनीच्या संचालकांना दिलेल्या धमक्या, अनेक साक्षीदारांच्या साक्षी, गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे आणि न्यायवैद्यक पुरावे याच्या आधरावर वाल्मीक कराड याला संतोष देशमुख हत्याप्रकरणी दोष मुक्त करण्याचे नाकारण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई: प्रतिनिधी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष ठरविले आहे. तपास यंत्रणांनी केलेले कोणतेही आरोप सरकारी वकील...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा
शनि शिंगणापूर गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचारी जाळ्यात
वडगाव मावळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; तातडीने बंद करण्याची भाजपची मागणी
'जावयाला अडकवण्यासाठी पोलिसांनीच तरुणी पाठवल्या'
खराडी परिसरासह शहरातील खाजगी पार्ट्या पोलिसांच्या रडावर
दिव्या देशमुख हिचे नागपुरात उत्स्फूर्त स्वागत

Advt